Breaking

केज येथे महावितरणच्या विरोधात लोंढे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

Updated: मार्च 24, 2026

By Vivek Sindhu

केज येथे महावितरणच्या विरोधात लोंढे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पोलिसांची सतर्कता : लेखी आश्वासन 

केज – अवमानकारक वागणूक देत समाज माध्यमातून बदनामी करणाऱ्या विद्युत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यावर कार्यवाही करण्यात यावी. या मागणीसाठी केज येथील दिव्यांग विनायक लोंढे व त्यांच्या पत्नीने २० मार्च रोजी केज येथील विद्युत महावितरण कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने अनर्थ टळला. तर महावितरणकडून लेखी आश्वासन देण्यात आले. 

 केज शहरापासून जवळ बीड रस्त्या लगत असलेल्या रमाई नगर भागात विनायक लोंढे यांचे कुटुंब वास्तव्यास असून त्यांना विद्युत मीटरचे बिल मिळाले नाही. थकीत वीज भरण्या संदर्भात कुठलीही नोटीस न देता कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा घरगुती विद्युत पुरवठा तोडला. त्या नंतर ते थकीत बिलापैकी पैकी ५०% टक्के वीज बिल भरण्यासाठी कार्यालयात गेले. त्यांनी उर्वरित ५०% टक्के रक्कम भरणा करण्यास सवलत मागितली. मात्र त्यांचे जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यावरून त्यांना अपमानित करून कार्यालया बाहेर हाकलून दिल्याने त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. तर कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांच्या तक्रारी वरून लोंढे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा ही दाखल झाला होता. त्यानंतर कनिष्ठ अभियंता सय्यद यांनी माध्यमांशी बोलून त्यांनी समाज माध्यमावर नाहक बदनामी केली. मागणीची दखल न घेता उलट गुन्हा दाखल केला. म्हणून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून आपल्या न्याय देण्यात यावा. या मागणीसाठी विनायक लोंढे व त्यांच्या पत्नीने २० मार्च रोजी विद्युत महावितरण कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार लक्ष्मण कीर्तने, गोपनीय शाखेचे शिवाजी कागदे, पोलीस नाईक पूजा माके यांनी तत्परता दाखवून त्यांचे आत्मदहन रोखले. तर उपकार्यकारी अभियंता एम. जी. सय्यद यांनी लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे.


Categories

Recent Posts