Breaking

चिंचोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरांतून २६ हजार ५०० रुपयांचा माल लंपास

Updated: मार्च 21, 2026

By Vivek Sindhu

दोन घरांतून २६ हजार ५०० रुपयांचा माल लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा तालुक्यातील चिंचोली येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. दिलीप नवनाथ शिरोळे (वय ४२, रा. चिंचोली) यांनी याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिरोळे यांच्या घराच्या हॉलच्या दरवाजाची कडी उघडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

त्याच रात्री चोरट्यांनी गावातीलच नवनाथ जिजाबा मांगले (वय ६०) यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे पेडल, सोन्याचे मणी, नथ आणि रोख रक्कम असा एकूण २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणाची नोंद अंमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts