Breaking
Updated: मार्च 21, 2026
अंबाजोगाईत ईद-उल-फित्र निमित्त राजकिशोर (पापा) मोदी यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशहरातील ईदगाह मैदान गवळीपुरा व मरकज मस्जिद येथे सकाळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा करतात. नमाज पूर्ण झाल्यानंतर एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देण्याची आणि बंधुभाव व्यक्त करण्याची अंबाजोगाईत परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर, ईदगाह मैदान गवळीपुरा येथे नमाजनंतर मुस्लिम बांधवांची भेट घेऊन पापा मोदी यांनी त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या आनंददायी क्षणी समाजात प्रेम, एकोपा आणि सौहार्द अधिक दृढ व्हावे, अशी सदिच्छा ही मोदी यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक समितीचे राज्याध्यक्ष डॉ.राजेश इंगोले, उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया, नगरसेवक राजपाल जावळे, श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज लखेरा, माजी नगरसेवक सुनील वाघाळकर, माजी नगरसेवक गणेश मसने, कार्यकर्ते सचिन जाधव, दत्ता सरवदे, बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे माजी चेअरमन कचरूलाल सारडा हे उपस्थित होते. यावेळी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सणाच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात राजकिशोर मोदी यांनी म्हटले की, अंबाजोगाई शहर हे नेहमीच सर्वधर्मसमभावाचे आणि सामाजिक सलोख्याचे केंद्र राहिले आहे. रमजानचा पवित्र महिना आपल्याला संयम, त्याग आणि मानवतेची शिकवण देतो. ईदचा हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ व्हावी, हीच प्रार्थना. हा पवित्र सण आपल्या समाजात करूणा, बंधुभाव आणि एकतेची भावना अधिक दृढ करो. सर्वांचे जीवन आरोग्यदायी आणि आनंदी राहो, अशी मी प्रार्थना करतो. असे राजकिशोर (पापा) मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. या सणामुळे शुक्रवारी सायंकाळपासूनच अंबाजोगाई शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. आज शनिवार, दिनांक २१ मार्च रोजी सकाळी शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर आणि विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज पठण केले. नमाजानंतर एकमेकांना गळाभेट देऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छांचे आदान – प्रदान करण्यात आले. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी देखील एकमेकांना शुभेच्छा देत अंबाजोगाईच्या गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन घडविले. त्यानंतर दिवसभर राजकिशोर मोदी आणि युवा नेते संकेत मोदी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील विविध भागांतील मुस्लिम बांधवांची त्यांच्या घरी जावून प्रत्यक्ष भेट घेऊन शिरखोरमा आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेतला. व शुभेच्छा दिल्याबद्दल अंबाजोगाई शहरातील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि बांधवांनी मोदी यांचे आभार मानले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई शहरातील विविध भागांत मुस्लिम बांधवांकडून शिरखोरमा आणि गोड पदार्थांचे वाटप करून आनंदाने व उत्साहाने ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद हा सण साजरा करण्यात येत आहे.