बीड शहर पोलिसांची मोठी कामगिरी
बीड – चोरीला गेलेले दहा लाख पन्नास हजार रूपयांचे सोने 48 तासात परत मिळविण्यात आले आहेत. बीड शहर पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे. याबाबत बीड शहर पोलिसांच्या कामाचे बीड शहरातून कौतूक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की दि. आठ जून 2024 रोजी, डॉक्टर लक्ष्मीकांत आंधळे यांच्या घरातून ते बाहेर गेले असताना घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या कपाटात ठेवलेले गळ्यातली चैन, गंठण, आणि अंगठी असे 11 तोळे सोने चोरट्याने चोरी करून नेले होते. दिवसा चोरी झाल्याने पोलिसांपुढे याची आव्हान तयार झाले होते.
सीसीटीव्हीच्या मदतीने त्या भागामध्ये कोण कोण गेले आहे यावर लक्ष ठेवण्यात आले. यातून एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून संपूर्ण गेलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीचे नाव लक्ष्मी प्रमोद वडमारे (रा. पंचशील नगर बीड) असे आहे. दोनच दिवसात पोलिसांनी चोरीस गेलेल्या मुद्देमाल परत मिळवल्यामुळे फिर्यादीने समाधान व्यक्त केले आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड, पोलीस अंमलदार संजय राठोड, मनोज परजणे, गहिनीनाथ बावनकर, राम पवार यांनी नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे.