अंबाजोगाई (प्रतिनिधी)- एकेकाळच्या दलित युवक आघाडीचे लढाऊ शिलेदार, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेतील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त प्रा.एस.के.जोगदंड यांच्या जीवनचरित्रावरील ‘सम्यक पांथस्थ आबा’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत रविवारी शहरातील विलासराव देशमुख न.प.सभागृह, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला होता.