Breaking

युसुफ वडगावात धार्मिक कार्यक्रमाचा निधी आणि दागिन्यांवर डल्ला; सव्वा दोन लाखांची चोरी

Updated: जानेवारी 15, 2026

By Vivek Sindhu

शस्त्राचा धाक दाखवत तालखेडजवळ थरारक रोडरॉबरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धनेगाव फाटा परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका शेडचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय गोदावरी बाबुराव सुर्यवंशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी गोदावरी सुर्यवंशी या आपल्या पतीसह धनेगाव फाटा शिवारातील शेत सर्व्हे क्रमांक १२९ मधील पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. १३ जानेवारी २०२६ च्या रात्री त्या आपल्या एका नातेवाईकासह शेडमध्ये झोपलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेडचे गेट आणि दरवाजा उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी पेटीचे कुलूप उचकटून त्यातील ८ ग्रॅम ७९० मिली वजनाची सोन्याची मण्यांची पोत, ९ ग्रॅम ३०० मिली वजनाची सोन्याची बोरमाळ आणि धार्मिक कार्यक्रमातून जमा झालेली ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

१४ जानेवारीच्या मध्यरात्री जेव्हा फिर्यादी उठल्या, तेव्हा त्यांना दरवाजा उघडा दिसला आणि पेटीतील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३३४(१) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सिताराम डोंगरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Related Posts :

Categories

Recent Posts