केज: केज शहर हे खामगाव-पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर या महामार्गाच्या जोडणीवर असलेले शहर आहे. वरील दोन्ही महामार्ग झाल्यानंतर आता केज शहरातील भागात वाहतूक व रहदारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच वरील दोन्ही महामार्ग केज च्या आंतरिक भागात भवानी चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (चौक) या भागात एकत्र येत असल्याने या भागात एकत्रित वाहतुकीचा भार वाढला आहे.