Breaking

श्री विमलनाथ दिगांबर जैन मंदिरात जैन आरती संग्रहाचे विमोचन

Updated: डिसेंबर 30, 2025

By Vivek Sindhu

श्री विमलनाथ दिगांबर जैन मंदिरात जैन आरती संग्रहाचे विमोचन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबेजोगाई (प्रतिनिधी) – येथील सकल जैन समाजाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १००८ श्री विमलनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्राच्या २०२५ या वार्षिक उत्सव सोहळ्यात प्रसिद्ध लेखक कवी, गीत रचनाकार बलराज संघई यांच्या जैन आरती संग्रहाचे विमोचन धार्मिक उत्साहात संपन्न झाले. श्री १००८ विमलनाथ भगवंतांच्या मूर्तीचे भक्ती भावपूर्ण सुयोग्य शब्दातील प्रार्थनायुक्त स्वर संगीतबद्ध वर्णन असलेल्या हिंदी भाषेतील दोन आरतीचे विमोचन प्रसंगी अनेक भाविक व महिलांनी आरती नृत्य सादर केले.
आरती संग्रहाच्या विमोचन प्रसंगी अभिप्राय देताना प्रसिद्ध बाल साहित्यिक व महाराष्ट्रात शाळांमधून वाचन चळवळ राबवणारे, अनुराग पुस्तकालयाचे अभिजीत जोंधळे म्हणाले की, ” सामाजिक धार्मिक भावनेचे सुंदर शब्दात स्वर संगीतबद्ध वर्णन या आरतीच्या माध्यमातून झाले असून चित्रपटातील प्रचलित गाण्याच्या चाली न लावता भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित संगीतबद्ध रचना निर्माण केल्यामुळे अधिक धर्म प्रभावना झाली आहे, ” या वक्तव्यासह जोंधळे यांनी या आरती संग्रहाचे रचनाकार बलराज संघई, स्वर संगीत निर्माते एमजी स्टुडिओज मुंबई चे सारंग मालीचीकर व त्यांच्या पूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन केले.
या प्रसंगी क्षेत्राचे अध्यक्ष वर्धमान ढोले, माजी अध्यक्ष जीवनधर संघई, रत्नाकरजी कंगळे, मनोज देशमाने, सुधीर महाजन, डॉ. नितीन धर्मराव तसेच ब्रह्मचारी अनिल घेवारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. संदीप जैन व पंडित अमोल कोंडेकर यांनी केले. आरती निर्मिती साठी आर्थिक सहयोग केल्याबद्दल श्री व सौ डॉ. सुलभा उदयन परितकर जालना निवासी, श्री व सौ छाया विजयकुमार बेंडसुरे अंबेजोगाई निवासी यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात येथील संपूर्ण जैन समाजाने उत्साहाने सहभाग घेतला. रचनाकार बलराज संघई व उत्कृष्ट स्वर संगीतबद्ध करणारे एमजी स्टुडिओज मुंबई याचे सर्वांनी विशेष अभिनंदन केले.


Categories

Recent Posts