Breaking

तरुणास मारहाण, आठ जणांवर गुन्हा

Updated: डिसेंबर 27, 2025

By Vivek Sindhu

चौघांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – सोनीजवळा (ता. केज) येथील तमाशाच्या कार्यक्रमात एका तरुणास काठ्याने टोळके मारहाण करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या मारहाण प्रकरणातील अक्षय अशोक वैरागे याने ही त्याच्या भावाला आठ जणांनी मारहाण केल्याची तक्रार २६ डिसेंबर रोजी दिली आहे. अक्षय वैरागे याच्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ प्रताप वैरागे हा २१ डिसेंबर रात्री ७ वाजता म्हसोबा मंदिराजवळ लोकांना जेवायला वाढत असताना सुधीर प्रकाश वैरागे याने तू जेवायला का वाढतोस म्हणून शिवीगाळ करीत असताना त्याचे वडील अशोक वैरागे व चुलते राजू वैरागे हे समजूत काढून घरी गेले. त्यानंतर तमाशाचा कार्यक्रम पाहण्यास प्रताप हा गेल्यानंतर सुधीर वैरागे याने त्याचा मेव्हणा अजय कांबळे (रा. केज), दिपक कांबळे, सिताराम वैरागे, प्रकाश वैरागे, प्रभू वैरागे, रामभाऊ वैरागे, विजय वैरागे यांना जमवून या आठ जणांनी मिळून प्रताप वैरागे यास शिवीगाळ करीत लाथाबुक्याने तोंडावर, डोळ्यावर व पाठीवर मारहाण केली. अशी तक्रार दिल्यावरून या आठ जणांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार सुरेश गित्ते करताहेत.


Categories

Recent Posts