Breaking
Updated: डिसेंबर 23, 2025
साखर कारखानदारांची मुजोरी; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelऊस दर भाववाढ करिता आंदोलन कर्त्यावर पोलिसी बळाचा वापर
बीड – ऊस दर भाववाढकरिता ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेली बैठक ही निष्फळ ठरल्याने शेतकरी दि 22 पासुन गंगाखेड येथील जी 7 साखर कारखान्यासमोर बीड आणि परभणी जिल्ह्यातील हजारो ऊस पुरवठादार शेतकरी बेमुदत ठिय्या आंदोलन करत असून या प्रसंगी मुजोर साखर कारखानदारांनी पोलिसी बळाचा वापर करत संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करत अटक केल्याने हे आंदोलन येत्या काळात चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऊसाला प्रतीटन 3 हजार व अंतीम दर 4 हजार रुपये मिळावा याकरिता ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दि 8 डिसेंबर रोजी निवेदन केले.दि 15 डिसेंबर रोजी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला. या घटनेचे दखल घेत परभणीच्या जिल्हाधिकारी यांनी साखर कारखानदार आणि संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांची बैठक घेतली मात्र बैठक निश्फळ ठरल्याने आंदोलनकर्त्यांनी कोयता बंद-वाहतूक बंद आंदोलन सुरू केले. बुधवार दि 17 रोजी आंदोलनकर्त्यावर परभणी-गंगाखेड महामार्गावर अज्ञात वाहनातून कोयता घेऊन गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्त्यांची आक्रमकता पाहून हल्लेखोर पळून गेले. या घटनेमुळे ऊस उत्पादक आणि पुरवठादार शेतकरी यांच्यात तीव्र संताप निर्माण झाला असताना देखील साखर कारखाना प्रशासनाने ऊस उपत्पादक शेतकऱ्यांच्या मागणी बाबत उदासिनता दाखवलेली असल्याने सोमवार दि 22 रोजी संत जनाबाई मंदिर ते G7 शुगर्स, माखणी कारखाना पर्यंत ऊस उत्पादक संघर्ष दिंडी काढून आपला आक्रोश दाखवून दिला. अखेर शेवटी आंदोलनकर्ते आपल्या मागण्याकरिता साखर कारखाना गेटवर येवून बेमुद ठिय्या आंदोलन सुरू केल्यावर साखर सम्राटांनी पोलीस बळाचा वापर करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हुसकून लावत अटक सत्र सुरू केले.
साखर सम्राटाकडून ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर करण्यात आलेल्या या अन्यायाविरोधात संघर्ष कडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून येत्या काळात ऊस बंद, कोयता बंद, वाहतूक बंद या सोबतच कारखाना बंद करण्याची तयारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवली आहे. सोमवार दि 22 रोजी च्या आंदोलनात परळी, सोनपेठ, गंगाखेड, पालम आदी बीड व परभणी जिल्हयातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.