Breaking

सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती

Updated: डिसेंबर 17, 2025

By Vivek Sindhu

डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वैद्यकीय कक्षाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्तीचे पत्र त्यांना नुकत्याच देवडी या ठिकाणी संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण व पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्य आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. या निवडी बद्दल डॉ.इंगोले यांचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

डॉ.राजेश इंगोले हे मागील अनेक वर्षांपासून इंडियन मेडिकल असोसिएशन या राज्यस्तरीय वैद्यकीय संघटनेचे क्रियाशील राज्य पदाधिकारी, सांस्कृतिक समिती राज्याध्यक्ष तसेच स्थानिक शाखेचे सात वर्षे अध्यक्ष होते. या संघटनेच्या माध्यमातून त्यांचा राज्यभर संपर्क निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच मागील अनेक वर्षापासून त्यांचा केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक सामाजिक क्षेत्रात सतत सहभाग असतो. याच सामाजिक कार्यामुळे त्यांची मागील पाच वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी परिषदेशी नाळ जुळली आणि मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून ते अंबाजोगाई तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी सातत्याने घेत आहेत. मागील पाच वर्षांपासून अंबाजोगाईतील पत्रकारांसाठी सातत्याने आरोग्य शिबीरे भरवत असतात तसेच वेळोवेळी पत्रकार बांधवांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करीत असतात. वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात डॉ.राजेश इंगोले यांची महत्त्वाची भूमिका सातत्याने राहिलेली आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक पत्रकारांच्या आजारांचे योग्य निदान लागल्यामुळे या आजारा संदर्भात काळजी घेण्यासाठी डॉ.इंगोले हे सातत्याने मोफत सल्ला देत असतात. डॉ.इंगोले यांच्या कार्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी कौतुक केलेले असून डॉ.राजेश इंगोले यांनी मराठी पत्रकार परिषदेसाठी राज्यभर काम करावे, विविध उपक्रम राबवावेत असा त्यांचा वारंवार आग्रह होता आणि त्यामुळेच नुकत्याच धारूर तालुक्यातील देवडी या ठिकाणी झालेल्या पुरस्कार वितरण व पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्यात डॉ.राजेश इंगोले यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, पद्मश्री पोपटराव पवार, एस.एम.देशमुख (मुख्य विश्वस्त), मिलिंद अष्टीवकर (अध्यक्ष, अ.भा.म.प.), दिलीप सपाटे (अध्यक्ष, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ) यांच्या हस्ते डॉ.राजेश इंगोले यांना हे नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीचे समाजातील सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.


Categories

Recent Posts