अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई नगरपरिषदेने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमातून जागतिक पर्यावरण दिनी सर्व्हे नंबर-१७ मध्ये विविध प्रजातींच्या ४० रोपांचे वृक्षारोपण केले. वर्षभर ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून वृक्ष संवर्धनास चालना मिळणार असून व वृक्ष संगोपन ही करण्यात येणार आहे.