Breaking

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यातच पूर्ण करा; आ. नमिता मुंदडा यांची अधिवेशनात मागणी

Updated: डिसेंबर 12, 2025

By Vivek Sindhu

२३ व्हिडिओ क्लिप्सनी उलगडली क्रूरता

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई / नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाकडे त्यांनी प्रश्नोत्तरे सत्रात शासनाचे लक्ष वेधले असून, ही संपूर्ण प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

आमदार नमिता मुंदडा यांनी सभागृहात भूमिका मांडताना स्पष्ट केले की, सध्याच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेतील उशिरामुळे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू करून ती मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. असे झाल्यास सर्व शिक्षक नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या नवीन कार्यस्थळी हजर राहू शकतील आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळेल, असा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला.

आमदार मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन ही बदली प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात दिले. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


Related Posts :

Categories

Recent Posts