अंबाजोगाई : तालुक्यातील गिता येथील २६ वर्षीय विवाहितेने सासरच्यांच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.०५) घडली आहे. शुभांगी संतोष शिंदे (रा. गीत्ता, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे.