Breaking

धानोरा खु., तट बोरगाव येथे कृषीच्या बत्तीस कलमी कार्यक्रमांतर्गत मोहीम संपन्न

Updated: June 6, 2025

By Vivek Sindhu

कृषी विभाग व नॅचरल शुगरचा संयुक्त उपक्रम

WhatsApp Group

Join Now

कृषी विभाग व नॅचरल शुगरचा संयुक्त उपक्रम

मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करत आहेत खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचे एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होण्याच्या अनुषंगाने कृषी विभागाने खरीप हंगाम २०२५ नियोजन आराखडा तयार केला.

असून त्या अंतर्गत बत्तीस कलमी उपक्रमांची अंमलबजावणीचे नियोजन केले आहे. सदर मोहिमेअंतर्गत कृषी विभागाचे कृषी सहाय्यक पंडित काकडे व नॅचरल शुगर रांजणीचे ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी संयुक्त विद्यमाने धानोरा खुर्द व तट बोरगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमामध्ये कृषी सहाय्यक पंडित काकडे यांनी मृदा आरोग्य पत्रिका आधारे सोयाबीन ऊस पिकाचे खत व्यवस्थापन, बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, सोयाबीन पिकामध्ये रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचा अवलंब, महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचे अर्ज दाखल करणे, खरीप हंगामातील पिकांच्या पीक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणे, फळबाग लागवड योजना संदर्भात विस्तृतपणे माहिती दिली.

नॅचरल शुगरचे ऊस विकास अधिकारी येळकर यांनी हिरवळीच्या खतांचा वापर करण्यासाठी करावयाचे नियोजन, बायोचारचा वापर, ऊस पिकांमधील कांडी कीड, गवताळ वाढ, चाबुक कानी रोग व्यवस्थापन करिता करावयाच्या उपायोजना बाबत विस्तृतपणे माहिती दिली.

त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या पीएम प्रणाम योजनेअंतर्गत नॅचरल शुगर उत्पादित फर्मंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर, लिक्विड फर्मेंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर चा वापर बाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रवी मुंडे, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार पवार, कृषी पर्यवेक्षक माचवे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.