केज – इयत्ता १२ वीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली.
तालुक्यातील एका गावातील इयत्ता १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी ही ३० मे रोजी रात्री आपल्या कुटुंबियांसह झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ती झोपलेल्या ठिकाणी आढळून न आल्याने गावात, ती शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी व नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिचा शोध लागला. तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार ४ जून रोजी तिच्या वडिलांनी दिल्यावरून केज पोलिसात अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार उमेश निकम हे करीत आहेत.
दरम्यान, सदरील मुलीचा रंग सावळा असून उंची १५४ सें. मी. आहे. तिचे नाक सरळ व अंगाने सडपातळ आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज पॅन्ट आहे. अशा वर्णनाची मुलगी आढळून आल्यास केज ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ही फौजदार निकम यांनी केले आहे.