Breaking

चालत्या एसटी बसने घेतला पेट

Updated: June 9, 2025

By Vivek Sindhu

चालत्या एसटी बसने घेतला पेट

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

केज – केज कडून कळंबकडे जाणारी प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक आज (दि.९) सोमवार रोजी दुपारी ३ च्या सुमारास पेट घेतला. मात्र या अपघातात चालक आणि वाहकाच्या प्रसंगाधावनतेमुळे पुढील अनर्थ टळलेला आहे.

अधिक माहिती अशी कि, कळंब आगाराची केज कळंब (एम एच १९/बी एल-९३७५) या क्रमांकाची एसटी बस केज कडून कळंबकडे जात असताना केज ते साळेगाव दरम्यान चिंचोली पाटी जवळ असलेल्या शेख फरीदबाबा दर्गा जवळ बसच्या बोनेटने अचानक पेट घेतला. अचानक पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून एसटी बस चालक अनिल बारकुल आणि वाहक भांगे यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेतली. तोपर्यंत प्रचंड आग लागलेली होती. परंतु चालक आणि बाहक यांनी प्रसंगावधान राखत त्यांनी प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी हजर झाली परंतु तो पर्यंत पूर्ण एसटी जळून खाक झालेली होती. या अपघातात तीन ते चार प्रवासी हे किरकोळ जखमी झालेले आहेत.