Breaking
Updated: डिसेंबर 1, 2025
राजकिशोर (पापा) मोदींना 'कपबशी' पुन्हा एकदा ठरणार लकी..!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआज राजकिशोर मोदींची परिस्थिती जवळपास २०११ सारखीच आहे. २०२१ पासून मोदी सत्तेत नाहीत. त्यामुळे लोकांच्या आठवणीत राहतील अशी दाखविण्यासाठी नजीकच्या काळातील विकासकामे नाहीत. पूर्वीच्या विकास कामांवर मधील काळात दुसरी कामे झाली आहेत. त्यातच मोदी स्वतः आता राष्ट्रवादीत आहेत तर त्यांचे विरोधक नंदकिशोर मुंदडा हे भाजप मध्ये आहेत. मुंदडा यांच्याकडे आमदारकीच्या माध्यमातून सत्ता आहेच. मोदींचे सर्व डावपेच ओळखून असलेल्या मुंदडा यांनी मागील ९ वर्षांपासून मोदींना विविध मार्गांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, काहीही चुकीचे केलेले नाही. म्हणून मोदी ठामपणे विरोधकांचे खोटे आरोप फेटाळून लावत आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच दोघेही आघाड्या करून लढत आहेत. यावेळी मुंदडा यांनी मोदी यांच्या अनेक सहकार्यांना स्वतःकडे घेत त्यांना एकटे पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मोदींवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. मुंदडा यांच्या तगड्या सोशल मीडिया टीमने कार्टून, व्हिडिओ क्लिप, आधुनिक प्रचार क्लुप्त्या वापरून मोदींची प्रतिमा डागाळण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू ठेवला आहे, पण, तसे काही होणार नाही. मोदी पराभूत होणार आहे अशी जोरदार वातावरण निर्मिती सोशल मीडियावर आहे. पण, प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोदींच्या उमेदवारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू होते. स्वतःच्या आघाडीच्या निवडणुक चिन्हासाठी मुंदडा यांनी जाणीवपूर्वक ‘कपबशी’ला प्रथम प्राधान्य दिले. परंतु, पुन्हा एकदा नशिबाने मोदींच्या बाजूने कौल दिला. सोडतीमध्ये कपबशी मोदींनाच मिळाली. त्यामुळे मोदी यांच्यासह सर्व टीमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू असा आत्मविश्वास मोदी आणि कार्यकर्त्यांत आहे. २०११ प्रमाणेच मोदी निकराने लढत आहेत, सोशल मीडियावरील चर्चेकडे लक्ष न देता सुप्तपणे त्यांचा प्रचार सुरू आहे. आजच्या अटीतटीच्या लढतीत २०११ प्रमाणेच ‘कपबशी’ हे चिन्ह राजकिशोर मोदी आणि लोक विकास महाआघाडीला लकी ठरणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.