Breaking

घाटनांदुर-अंबाजोगाई – श्रीगोंदा रेल्वे मार्गासाठी डॉ. आदित्य पतकराव यांनी घेतला पुढाकार

घाटनांदुर-श्रीगोंदा रेल्वे

WhatsApp Group

Join Now

मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्या महत्त्वपुर्ण बैठीकत केला आग्रह

मुंबई – गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घाटनांदुर- श्रीगोंदा रेल्वे मार्ग मंजूर करण्याच्या मागणीसह इतर दोन मागण्यांसाठी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांचे प्रादेशिक रेल्वे सल्लागार डॉ. आदित्य पतकराव यांनी आग्रह धरला.

आज मुंबईत मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्या ZRUCC घ्या बैठकीत या राज्याचे प्रादेशिक सल्लागार म्हणून डॉ. आदित्य पतकराव यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक धर्मवीर मिना जी यांनी प्रत्येक सदस्यांनी फक्त तीन महत्त्वपुर्ण प्रस्तावाच्या सुचेना कराव्यात असे आवाहन केले होते.

या बैठकीत बोलताना घाटनांदुर श्रीगोंदा या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तत्कालीन रेल्वेमंत्री या. सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात पुढे आला होता. त्यांच्याच कार्यकाळात या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण ही पुर्ण करण्यात आले असून आता हा नवीन रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लावावा असा आग्रह त्यांनी या बैठकीत धरला.

या सोबतच सोलापूर विभागातील मुरुड हे स्थानक एक महत्त्वाचे स्थानक असून मोठे व्यापारी केंद्र आहे. या स्थानकातुन दररोज 2 हजार प्रवासी मोठ्या शहराकडे प्रवासाची जातात. या पार्श्वभूमीवर या स्थानकाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी एक प्रस्ताव आपण सादर केला असून सदरील प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

या सोबतच तिसरी मागणी करतांना प्रादेशिक सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी आपत्कालीन तिकिटासाठी अर्ज प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सध्या ZRUCC सदस्यांना आपत्कालीन तिकिटासाठी अर्ज करावयाचा असल्यास तो फॅक्स ने पाठवण्याची अट आहे. मात्र आजच्या डिजिटल युगात फॅक्स सेवा सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध होत नाही. माझा आग्रह आहे की, फॅक्स ऐवजी इमेल किंवा व्हाटसऍप सारख्या डिजिटल माध्यमांद्वारे अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया लागू करण्यात यावी, जेणे करून ही सुविधा अधिक सुलभ, वेगवान आणि प्रभावी होईल.

आज झालेल्या ZRUCC घ्या बैठकीत प्रादेशिक सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी सुचवलेल्या तीन ही मागण्या अत्यंत प्रमाणे मांडण्यात आल्या असून मराठवाडा आणि सोलापूर विभागातून या मागण्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

काय आहे पार्श्वभूमी ?

1975 घ्या केंद्रीय मंत्रीमंडळात सुरेश प्रभू यांना रेल्वे मंत्रालयाचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. सुरेश प्रभू यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच अंबाजोगाई शहराला रेल्वे मार्गाच्या नकाशावर आणण्याच्या कामास गती मिळाली. आणि घाटनांदुर श्रीगोंदा हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित झाला. हा नवीन रेल्वेमार्ग घाटनांदुर, अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा आणि श्रीगोंदा” अशा पध्दतीने प्रस्तावित करण्यात आला होता. एवढेच नाही तर सुरेश प्रभू एवढ्यावरच थांबले नाहीत तर 1976 साली त्यांनी या रेल्वे मार्गाचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश ही दिले होते.

पुढे 2015 मध्ये या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण साठी 34 लाख 05 हजार रुपयांचे बजेट पडल्यानंतर दिपावलीच्या सुमारास घाटनांदुर, अंबाजोगाई, केज नेकनूर परिसरात सर्वेक्षण करून अधिका-यांनी या नियोजित रेल्वे मार्गावर रेल्वे सर्वेक्षणाचे अधिकृत स्टोन ही लावले होते.

आज या घटनेला बरीच वर्षे झाली तरी हा नियोजित रेल्वेमार्ग अजूनही मध्य रेल्वे विभागाच्या कार्यालयातील फायलीत धुळखात पडूनच होता. आता रेल्वेचे प्रादेशिक संचालक डॉ. आदित्य पतकराव यांनी मांडलेल्या या मागणीमुळे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई केज नेकनुर मांजरसुंबा या तालुक्यातील नागरीकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

Last Updated: June 5, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.