Breaking
Updated: नोव्हेंबर 21, 2025
.जनार्दन भगत तालुका कृषी अधिकारी धारूर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelजनार्दन भगत तालुका कृषी अधिकारी धारूर
धारूर – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फ त शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘महाविस्तार एआय’ या मोबाइल पच शेतकऱ्यांनी व्यापक बापर करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हे पाच शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी सहाय्यक म्हणून कार्य करणारे असून शेतीविषयक कोणताही प्रश्न शेतकरी मराठीत विचारू शकतात व त्यावर अचूक, वैज्ञानिक आणि तात्काळ सल्ला मिळणार आहे. या ॲपमधून शेतकऱ्यांना हवामानाचा रिअल
टाइम अंदाज, राज्यातील विविध बाजार समित्यांतील बाजारभाव, पिकांचे रोग कीड निदान, तसेच पीक व्यवस्थापन,
खत-पाणी व्यवस्थापन, संरक्षण उपाय याबाबत माहिती सहज उपलब्ध होते पिकांचा फोटो अपलोड केल्यास रोग, कीड किंवा पोषणासंबंधी समस्यांचे निदान
करून योग्य उपाययोजना सुचवली जाते. शासकीय योजना, विविध अनुदान, विमा बासंदर्भातील माहितीही या ॲपमध्ये एकाच ठिकाणी मिळते. प्रगतीशील शेतकरी व कृषी विद्यापीठातील तज्ञांशी संवादाची सुविधादेखील यामधून मिळते ‘महाविस्तार एआय’ हे प गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असून शेतकरी आपल्या मोबाईलमध्ये हे डाऊनलोड केल्यास घरबसल्या पिकांची संपूर्ण काळजी व व्यवस्थापनाचे मार्गदर्शन या मधून मिळणार असून शेतकऱ्यांनी या ॲप अवश्य वापर करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भगत . यांनी केले.