Breaking
Updated: नोव्हेंबर 17, 2025
माजी नगरसेविका वासंती बाबजे आणि मिलिंद बाबजे यांचा भाजपमध्ये प्रवेश
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनंदकिशोर मुंदडा यांच्यातच अंबाजोगाईचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता – वासंती बाबजे
अंबाजोगाई : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकीय वातावरणात मोठी घडामोड झाली आहे. नगर परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती वासंती बाबजे आणि त्यांचे पती मिलिंद बाबजे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत नंदकिशोर मुंदडा यांना पाठींबा जाहीर केला आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असताना झालेला हा प्रवेश विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नगर परिषदेत सभापती म्हणून वासंती बाबजे यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना चांगला जनसंपर्क व विश्वासार्हता मिळाली होती. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रवेश सोहळ्यात आ. नमिता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी बाबजे दांपत्याचे स्वागत केले.
आ. नमिता मुंदडा यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे वासंती बाबजे यांनी यावेळी सांगितले. शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास फक्त नंदकिशोर मुंदडांच्या नेतृत्वाखाली शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या उज्वल भविष्यासाठी नंदकिशोर यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रवेशामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.