Breaking
Updated: नोव्हेंबर 12, 2025
दोघांना मटका घेताना पकडले ; वीस हजाराचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज शहरातील कानडी चौक व मंगळवार पेठ कॉर्नर जवळ दोघे जण मटका घेत असल्याची गुप्त माहिती केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना मिळाली. त्यांच्या आदेशावरून फौजदार सुकुमार बनसोडे, जमादार विकास चोपणे, जमादार राजू गुंजाळ यांच्या पथकाने ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता कानडी चौकाजवळ असलेल्या एका टपरीवर छापा मारून महेश महादेव मुळे (रा. क्रांती नगर, केज) यास मटका घेताना पकडले. तर मटका लावण्यास आलेले लोक पोलिसांना पाहून पळून गेले. पोलिसांनी महेश याच्याकडील नगदी २ हजार रुपये ८२० रुपये व १० हजार रुपयांचा मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. तत्पूर्वी, या पथकाने मंगळवार पेठ कॉर्नर जवळ छापा मारून चालता फिरता मटका घेणाऱ्या संभाजी यादवराव हजारे (रा. कासारी) यास पकडून त्याच्याकडील नगदी पाचशे वीस रुपये व सहा हजार रूपयांचा मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी महेश मुळे व संभाजी हजारे या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.