केज – केज येथील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रविवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाई मोहन गुंड यांनी दिली आहे.
मेळाव्यास शेकापचे सरचिटणीस माजी आ. भाई जयंत पाटील, माजी आ. भाई बाळाराम पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, शेतकरी सभेचे प्रदेशाध्यक्ष भाई एस. व्ही. जाधव, पक्षाचे खजिनदार भाई अतुल म्हत्रे, कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, सहचिटणीस भाई बाबासाहेब देवकर, कार्यालयीन सहचिटणीस भाई प्रा. उमाकांत राठोड, महिला आघाडी प्रदेश चिटणीस मानशी म्हात्रे, जेष्ठ नेते भाई बाबुराव लगारे, बाधित शेतकरी महामार्ग आघाडीचे भाई दिगंबर कांबळे, शिक्षक आघाडीचे प्रा. चंद्रकांत चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई युनुस पठाण, राज्य चिटणीस मंडळ सदस्य डॉ. अनिकेत देशमुख, चिटणीस मंडळ सदस्य ॲड. उदय गवारे, चिटणीस मंडळ सदस्य भाई विकास शिंदे, चिटणीस मंडळ सदस्य चित्रलेखा गोळेगावकर , विद्यार्थी आघाडीचे साम्या कोरडे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व मध्यवर्ती समितीचे सदस्य, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर चळवळ उभी करण्यासाठी विविध ठराव घेण्यात येणार आहेत. मराठवाडा विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्याच्या निवडी ही केल्या जाणार आहेत. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन भाई मोहन गुंड यांनी केले आहे.