Breaking
Updated: June 7, 2025
WhatsApp Group
Join Nowसर्व भाविक भक्तांना शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना कळविण्यात येते की प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी वारी निमित्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज नरसी नामदेव व संत श्रेष्ठ जनाबाई गंगाखेड यांच्यासह अनेक पालख्या या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात यानिमित्ताने संपूर्ण मराठवाड्यातील पहिले ऐतिहासिक भव्य अश्व रिंगण आपल्या अंबाजोगाई मध्ये संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये भव्य वारकरी दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
आपल्या लहान मुलांवर भारतीय संस्कृतीचे विशेष करून वारकरी सांप्रदायाचे संस्कार रुजावेत. तसेच वारकरी संप्रदायाच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्मसमभाव जोपासला जावा, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची सत्प्रवृत्ती निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे विशेष करून आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी तिन्ही गटांमध्ये प्रथम पारितोषिक 3100/- रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक 2001/- रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक 1001/- रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ 500/- रुपये प्रमाणपत्र प्रत्येकी दोन याप्रमाणे ठेवण्यात आलेले आहेत. हजारो वारकरी व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये भव्य अश्व रिंगण सोहळा गुरुवार दिनांक 26 जून 2025 गुरुवार रोजी संपन्न होणार आहे. याच दिवशी शालेय वारकरी समूह दिंडी नृत्य स्पर्धा स्पर्धा दुपारी ठीक बारा वाजता योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रारंभ होतील
अंबाजोगाई शहरातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी. वारकरी दिंडी मध्ये वारकरी पोशाखा सोबतच विविध संतांचा पोशाख असणे अभिप्रेत आहे. अंबाजोगाई शहरातील सर्व शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यावे असे आवाहन भव्य अश्व रिंगण सोहळा संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा व सचिव तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क:-
1) श्री. प्रकाश बोरगावकर- 7517664761 2) श्री,बळीराम चोपणे- 7219250999 3) श्री, आनंत अरसुडे- 727618999