Breaking

राजेसाहेब देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Updated: नोव्हेंबर 4, 2025

By Vivek Sindhu

राजसाहेब देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आज एक महत्त्वपूर्ण राजकीय नियुक्ती जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
आज त्यांना या निवडीचे अधिकृत पत्र देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर आणि पक्षातील त्यांच्या आजवरच्या योगदानावर विश्वास ठेवून ही नवी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.

राजकीय पार्श्वभूमी: राजसाहेब देशमुख हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील एक परिचित नाव आहे.

काय म्हटलं नियुक्तीपत्रात :
या नियुक्तीपत्राद्वारे पक्षाने राजसाहेब देशमुख यांच्याकडून स्पष्ट अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. “पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वशक्तीनिशी योगदान द्याल,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच, “समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी” त्यांनी प्रयत्नशील राहावे, असेही पत्रात नमूद केले आहे. या नियुक्तीमुळे मराठवाड्यात, विशेषतः बीड जिल्ह्यात पक्षाला बळ देण्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.


Categories

Recent Posts