Breaking

अंबाजोगाईत व्यापाऱ्यावर हल्ला; करदोडे बदलण्याच्या वादातून मारहाण

Updated: नोव्हेंबर 3, 2025

By Vivek Sindhu

करदोडे बदलण्याच्या वादातून मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : शहरातील बाजार परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यापाऱ्यावर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी समीर सुधाकरराव कोथळे (रा. चनई, ता. अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मंडी येथील कुलस्वामिनी जनरल स्टोअर्ससमोर आरोपी अंकुश रावसाहेब कसबे (रा. अंबाजोगाई) याने करदोडे बदलून देण्याच्या कारणावरून वाद घातला. या वादातून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली, चापट मारली तसेच हातातील चावीने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार करून दुखापत केली.

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत.


Categories

Recent Posts