Breaking
Updated: नोव्हेंबर 3, 2025
आपेगाव रस्त्यावरील खड्यांनी गाठला कळस!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनागरीकांमध्ये तीव्र नाराजी
अंबाजोगाई/प्रतिनिधी: तालुक्यातील आपेगावला जाणाऱ्या अंकुर फाटा ते आपेगाव या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर खड्ड्यांनी अक्षरशः कळस गाठला असून, नागरिक, वाहनधारक व पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. संबंधीत विभागाने या रस्त्याकडे व रस्त्यावरील खड्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रीन बेल्ट म्हणूनओळखले जाणरे आपेगाव, सोमनाथबोरगाव, धानोरा खुर्द या परिसराकडे जाण्यासाठी लोखंडीसावरगावच्या पुढील रस्त्यावरून व अंकुर प्रतिष्ठानच्या जवळून रस्ता जातो. आपेगावकडे जाणारा या रस्त्याची अक्षरक्षा चाळणी झाली असून रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ मोठे खड्डे पडल्याने मोटारसायकल, कार चालवीतांना कसरत करावी लागत आहे. सोमनाथबोरगाव ते आपेगाव या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. "रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता" अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. पावसाचे पाणी खड्यांमध्ये साचल्याने वाहन चालकांना रस्ता ओळखणे कठीण होत आहे. या रस्त्यावरून एखाद्या आजारी रूग्णाला ताडीने अंबाजोगाईला घेऊन जायचे असेल तर रस्त्यावरील खड्यामुळे शक्य होत नाही. खड्यामुळे वाहन जलद गतीने चालविता येत नसल्याने रूग्णालयात नेण्या अगोदरच रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावरील खड्यामुळे नागरीकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महामंडळास आर्थीक नुकसान
आपेगाव येथे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने बसगाडी वारंवार नादुरूस्त होत आहे. रस्त्यामुळे टायर पंचर होणे, रॉड तुटणे, पत्रा चिरणे असे वारंवार प्रकार घडत आहेत. खराब रस्त्यामुळेच आपेगावहून सौंदना याठिकाणी जाणारी गाडी मागील एक वर्षापासून बंद झाली आहे. हा रस्ता ही योग्य नसल्याने आपेगावला जाणारी बसगाडी बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे परिसरातील २० गावातील नागरीकांची गैरसोय होणार आहे.
निवडणूकीत राहणार मुद्दा
आगामी होऊ घातलेल्या जि. प. व पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये या रस्त्याच्या मुद्दा समोर येणार असून. मागील सदस्यांन हा रस्ता करण्यासाठी व तो दुरुस्त करण्यासाठी कोणेतही प्रयत्न केला नसल्याचा आरोप परीसरातील नागरीक करतात. या परीसरात मोठ-मोठे नेते राहत असून त्यांनही या रत्याकडे दुर्लक्ष केल्याने परीसरातील नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.