Breaking

राज्यात पावसाचा जोर ५ दिवसांपासून कमीच

राज्यात पावसाचा जोर ५ दिवसांपासून कमीच

WhatsApp Group

Join Now

मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थेच

मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नाही. त्यामुळे मॉन्सून गेल्या ६ दिवसांपासून एकाच भागात मुक्कामावर आहे. मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाचा जोरही कमी झाला. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात मॉन्सून गेल्या ६ दिवसांपासून एकाच भागत आहे. मॉन्सूनचे प्रवाह मंदावले आहेत. त्यामुळे मॉन्सूनमध्ये प्रगती नाही. मॉन्सून राज्यात मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोचला आहे. त्यानंतर मॉन्सून पुढे सरकलाच नाही.

मॉन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. मॉन्सूनची वाटचाल कधी सुरु होईल, याविषयी हवामान विभागाने माहीती दिलेली नाही.

मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाचा जोरही कमी झाला. मागील ५ दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. जोरदार सर्वदूर पावसाचीन नोंद झाली नाही. असे असले तरी राज्यात पुढील ५ दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार सरींचीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर राज्यात काही ठिकाणी मात्र जोरदार सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Last Updated: June 3, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.