Breaking

दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, निष्काळजी चालकाविरुद्ध गुन्हा

Updated: ऑक्टोबर 31, 2025

By Vivek Sindhu

अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : सिरसदेवी शिवारातील राजमुद्रा हॉटेलजवळ दोन दुचाकींच्या अपघातात खेर्डा (बु.) येथील अक्षय त्रिभुवन (रा. खेर्डा बु., ता. गेवराई) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता घडला असून, पल्सर मोटरसायकल चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चंद्रकांत रानुजी त्रिभुवन (रा. खेर्डा बु., ता. गेवराई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचा पुतण्या अक्षय त्रिभुवन हे मोटरसायकल (क्र. MH21 F 5043) वरून खांडवीहून खेर्डा (बु.) येथे जात होते. सिरसदेवी शिवारात पोहोचल्यावर मागून भरधाव वेगात येणाऱ्या पल्सर मोटरसायकल (क्र. MH23 AM 9355) ने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने काकुनाना हॉस्पिटल, बीड येथे उपचारासाठी नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती सुधारत नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथे हलविताना मार्गातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पल्सर मोटरसायकलचालकाविरुद्ध निष्काळजी आणि बेफिकीरपणे वाहन चालवून मृत्यू घडविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बीड पोलिस करत आहेत.


Categories

Recent Posts