Breaking

देवीबाभुळगावात शेतकऱ्याच्या हातावर चाकूने वार, जीव घेण्याची धमकी

Updated: ऑक्टोबर 31, 2025

By Vivek Sindhu

देवीबाभुळगावात शेतकऱ्याच्या हातावर चाकूने वार, जीव घेण्याची धमकी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड (प्रतिनिधी) – देवीबाभुळगाव येथे घरासमोर बसलेल्या भावावर दोन भावांनी दारूच्या नशेत हल्ला करत शिवीगाळ, मारहाण आणि चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विलास भगवान जोगदंड (वय ६३, व्यवसाय शेती, रा. देवीबाभुळगाव, ता. जि. बीड) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

घटना दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर घडली. आरोपी सुरज ऊर्फ राम दत्ताजय जोगदंड आणि शाम दत्ताजय जोगदंड (दोघे रा. देवीबाभुळगाव) हे दारू पिऊन येऊन फिर्यादींच्या भावास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व चापटांनी मारहाण केली. आरोपी क्रमांक २ ने हातातील कड्याने राजेंद्र जोगदंड यांच्या नाकावर प्रहार करून दुखापत केली.

फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी बाहेर आले असता आरोपींनी त्यांना धरून ठेवले आणि “हातर मंदिराचे फैसे खातोय का?” अशी ओरड करत आरोपी क्रमांक १ ने हातातील चाकूने विलास जोगदंड यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून जखमी केले. तसेच “आमच्या नादी लागलात तर गोळी घालून ठार मारू” अशी धमकी दिली.

या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात अंतर्गत दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस नाईक पुंडे करीत आहेत.


Categories

Recent Posts