Breaking
Updated: ऑक्टोबर 29, 2025
अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पाऊस; सोयाबीनचे ढिगे पाण्यात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : तालुक्यात मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांनी काढलेले सोयाबीन शेतात किंवा अंगणात सुकवण्यासाठी ठेवलेले असताना अचानक आलेल्या पावसामुळे हे सर्व ढिग पाण्यात भिजले.
पावसामुळे शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काही ठिकाणी नाल्यांना पूर आला आहे. गावोगावी शेतकरी आपल्या साठवलेल्या सोयाबीनला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील काही परिसरात रब्बी पेरणी सुद्धा पुर्ण झालेली आहे. व पाऊस जास्त झाल्यामुळे कोवळी पिके वाया जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेती आणि जनजीवन दोन्ही विस्कळीत झाले आहे. शेतातील पिके पाण्यात बुडाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापूस या पिकांना फटका बसला असून अनेक शेतकर्यांचे तयार उत्पादन पावसामुळे नष्ट झाले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता राहणार असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.