Breaking

साडेबारा लाखांची गांजाची झाडे जप्त; चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई

Updated: ऑक्टोबर 28, 2025

By Vivek Sindhu

चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : चकलांबा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव (बु.) शिवारातील गट क्रमांक २४८ मधील शेतात लावलेल्या गांजाच्या झाडांवर कारवाई करत तब्बल ४२ किलो वजनाचा गांजाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात सुमारे १२ लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम बने या व्यक्तीने मालेगाव (बु.) गावाजवळील गट क्रमांक २४८ मधील शेतात गांजाची लागवड करून झाडांची जोपासना केली होती. यावरून चकलांबा पोलिसांनी तात्काळ स्टाफसह घटनास्थळी धाड टाकली. तपासणीदरम्यान शेतात गांजासदृश्य झाडे आढळून आली. त्यानंतर नायब तहसीलदार कट्टे आणि मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सर्व झाडे उखडून जप्त करण्यात आली.

या कारवाईत एकूण ४२ किलो वजनाचा गांजा मिळून आला असून, त्याची किंमत बाजारभावानुसार १२ लाख ५५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील आणि त्यांच्या चकलांबा पोलीस पथकाने केली.


Categories

Recent Posts