Breaking

अंबाजोगाईत ३१ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बैठक

Updated: ऑक्टोबर 28, 2025

By Vivek Sindhu

खा. बजरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांवर चर्चा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

खा. बजरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांवर चर्चा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी अंबाजोगाई शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीचे मार्गदर्शन बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग सोनवणे करणार असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के असतील. या बैठकीला राजेसाहेब देशमुख आणि डॉ. नरेंद्र काळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, प्रचार आराखडा आणि उमेदवारी नियोजनावर सविस्तर चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकांमध्ये ५० टक्के उमेदवारी तरुणांना देण्याचा निर्णय घेतला असून, या भूमिकेवरही बैठकीत सखोल विचारविनिमय करण्यात येणार आहे.

देशमुख यांनी आवाहन केले की, “अंबाजोगाई तालुका आणि शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी या आढावा बैठकीस वेळेत उपस्थित राहावे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे.”


Categories

Recent Posts