Breaking
Updated: ऑक्टोबर 28, 2025
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; वडवणी शहर बंदची दिली हाक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजी आ. नारायण मुंडेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
बीड – वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरने फलटण (जि. सातारा) येथे केलेल्या आत्महत्या प्रकरणामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. सोमवारी ८३ वर्षीय माजी आमदार नारायणराव मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक उपोषण केले, तर आज मंगळवारी वडवणी शहर बंदची हाक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. रास्ता रोकोला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सोमवारी खा. रजनी पाटील, रिपाइंचे पप्पू कागदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.
वडवणी तालुक्यातील रहिवासी असलेली महिला डॉक्टर फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिने २४ ऑक्टोबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. पीएसआय गोपाल बदने याने आपल्यावर ४ वेळा अत्याचार केल्याचे व प्रशांत बनकर याने मानसिक व शारीरिक छळ केल्याने आत्महत्या करत असल्याचे हातावर लिहिले होते.