Breaking

रोटरी क्लबने पोलिओ मुक्तीच्या घोषणा देत फडकाविला ५० फूटी ध्वज

Updated: ऑक्टोबर 27, 2025

By Vivek Sindhu

रोटरी क्लबने पोलिओ मुक्तीच्या घोषणा देत फडकाविला ५० फूटी ध्वज

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई -: जागतिक पोलिओ दिना निमित्त रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात ५० फूटी ध्वज उंचावत पोलिओ जनजागृती करण्यात आली. रोटरी क्लबच्या या उपक्रमात आ.नमिता मुंदडा ही सहभागी झाल्या होत्या.
पोलिओ निर्मूलनासाठी संपूर्ण जगात काम करणाऱ्या रोटरीने जगातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी जागतिक मोहीम सुरूच ठेवली आहे. पोलिओ दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने जनजागृती करण्यात आली. या निमित्ताने पोलिओ हद्दपार करा. असा संदेश देणारा ५० फूटी ध्वज उंचावत व जनजागृती करण्यात आली.
या वेळी बोलताना आ.नमिता मुंदडा म्हणाल्या की हा उपक्रम पोलिओ मुक्त जगासाठी रोटरीच्या लढ्याला अधिक बळ देणारा ठरला. तसेच पोलिओ मुक्त होणाऱ्या देशाबद्दल क्लबची कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी
गौरवास्पद आहे. आरोग्य जनजागृतीसाठी रोटरी क्लब सातत्याने विविध उपक्रम राबवून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊन काम करतात.याचे मुंदडा यांनी कौतुक केले. व त्यांनी पोलिओ फंडासाठी आर्थिक मदत केली. रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी यांनी आ.मुंदडा यांचे स्वागत केले. या प्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा रोहिणी पाठक ,उपाध्यक्ष धनराज सोळंकी , सचिव मंजुषा जोशी ,सहसचिव राधेश्याम लोहिया, क्लब ट्रेनर संतोष मोहिते, डॉ सुरेश अरसुडे, कल्याण काळे, डॉ नवनाथ घुगे,प्रवीण चोकडा, मोईन शेख ,स्वप्नील परदेशी,शकील शेख,राम सारडा , प्रदीप झरकर , डॉ कल्पना मुळावकर, डॉ अलका तडखलकर ,गोपाल पारिख,बालाजी घाडगे , हर्षवर्धन वडमारे, गोरख मुंडे अभिषेक मुंदडा,प्रा. अजय पाठक ,प्रोजेक्ट डायरेक्टर शशांक लोमटे, रोटरॅक्टच्या अध्यक्षा विशाखा बजाज , ऋषिकेश बजाज, यांची उपस्थिती होती.


Categories

Recent Posts