Breaking
Updated: ऑक्टोबर 26, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या सात दिवसीय भागवत कथा ज्ञानयज्ञात दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी रात्री प्रवचनादरम्यान विजेचा धक्का बसून प्रशांत सुधाकर सोनवणे (वय 23) या युवकाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्य ज्योती परिवार लातूर संस्थेच्या संवर्धन प्रकल्पांतर्गत अंबाजोगाईतील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान भागवत महापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कथेत आशुतोष महाराज यांच्या शिष्या साध्वी अदिती भारती प्रवचन देत आहेत.
रविवारी दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमादरम्यान आरती सुरू असताना प्रशांत सोनवणे याला थ्री-फेज विद्युतपुरवठ्याचा जोरदार धक्का बसला. तो काही अंतरावर फेकला गेला. उपस्थितांनी तत्काळ त्याला स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मयत प्रशांत याचे आई-वडील दोघेही स्वाराती रुग्णालयात कार्यरत आहेत. अतिशय धार्मिक असणारे हे संपूर्ण सोनवणे कुटुंब या भागवत कथा सप्ताहाच्या कार्यक्रमात सेवा बजावत होते. याच दरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.