Breaking
Updated: ऑक्टोबर 24, 2025
लिप्रतिपदा दिवशी बळीराजा रस्त्यावर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकर्जमाफी, हमीभाव करिता बलिप्रतिपदा दिवशी बळीराजा रस्त्यावर
बीड – कृषी संस्कृतीत बळी राजाचे महत्व विषद करत बलिप्रतिपदा हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो मात्र या ही वर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या घरी काळी दिवाळी साजरी होत असून ‘इडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो!’ संपूर्ण कर्ज माफी करून सोयाबीन, कापूस हमीभाव यासाठी किसान सभेमार्फत संपूर्ण बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी गावो गावी जोरदार निदर्शने करण्यात आली.
अतिवृष्टी मदत जाहीर करताना कोट्यवधींची मदत अशी जाहिरातबाजी करून प्रत्यक्षात मात्र प्रती हेक्टर साडेआठ हजारांपेक्षाही कमी मदत दोन हेक्टर मर्यादेत सरकारने वितरित करणे सुरू केले आहे. अजूनही यापासून बरेच शेतकरी वंचित आहेत. रब्बी हंगाम पेरणीपूर्व प्रति हेक्टर दहा हजार रुपयांच्या मदतीची व एक हेक्टर वाढीव क्षेत्राच्या मदतीची शेतकऱ्यांना आणखीन प्रतीक्षाच आहे. कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकार बोलायला तयार नाही. किफाशीर हमीभावाची मागणी तशीच प्रलंबित आहे. त्यात सातत्याने आयात निर्यातीत हस्तक्षेप करून भाव पाडणाऱ्या सरकारने हमीभावापेक्षा कमी भावात विकत असणाऱ्या कापूस सोयाबीन पिकाकडे लक्ष दिलेले नाही; म्हणून शेतकरी सातत्याने आडचणीत येऊन वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या कर आहे. यावर तात्काळ तोडगा म्हणून सरसकट शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना घोषित केलेल्या सर्व प्रकारच्या मदतीची निकोप पद्धतीने पूर्तता करावी. हमीभाव पेक्षा कमी भावात विकल्या जाणाऱ्या सोयाबीन व कापसासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत. शेतमजुरांना श्रम नुकसान भत्ता म्हणून तीस हजार रुपयाची मदत करावी. बड्या उद्योगपत्यांना मदत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांचे जबरदस्तीने होणारे भूमी अधिग्रहण तात्काळ थांबवण्यात यावे. शेतकऱ्यांची शेती उध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. या मागण्यांना घेऊन किसान सभेने बलिप्रतिपदेच्या दिवशी जिल्ह्यातील शेकडो गावागावातून आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत किसान सभेने शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सत्तेवर येण्यापूर्वी घोषणा करण्यात आलेली संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर मागण्या करिता दि 28 ऑक्टोबर नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
●●●●●●●●
सामान्य माणसांना मूलभूत प्रश्नांपासून दूर ठेवण्यासाठी व शासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह कोणी निर्माण करू नये यासाठी जाती, धर्म, पंथ, प्रदेश या अस्मितेत जखडवून समाज दुर्बल करण्याचे सरकारी षंढयंत्र सुरू आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जाती, धर्म, पंथ, प्रदेश सर्व बाबी बाजूला ठेवून आपली शेतकरी जात म्हणून एकत्र येऊन आवाज उठवावा व दि 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी कर्जमाफीच्या प्रश्नावर मोठ्या अखिल भारतीय किसान सभा शेतकरी संघटना प्रहार संघटना यांनी पुकारलेल्या महाएल्गार मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.