Breaking

केज मतदारसंघात विकासगंगा; आ. नमिता मुंदडा यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन मंडळातून कोट्यवधींचा निधी मंजूर

Updated: ऑक्टोबर 18, 2025

By Vivek Sindhu

आ. नमिता मुंदडा यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन मंडळातून कोट्यवधींचा निधी मंजूर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली केज विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना मोठा वेग मिळाला आहे. जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) अंतर्गत आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षण, जनसुविधा आणि अंगणवाडी बांधकाम यासाठी तब्बल कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातील शाळा, स्मशानभूमी व अंगणवाड्यांच्या उभारणीसाठी या निधीचा उपयोग होणार असून, मतदारसंघात सर्व स्तरावर विकासाची गती दिसून येत आहे.

जि.प. शाळांसाठी नवीन इमारतींचा निधी
अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील 24 हून अधिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी नवीन इमारती उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मांडवापठाण, वरपगाव, मोरेवाडी, येल्डा, वरवटी (उघडे वस्ती), भावठाना, डिघोळअंबा, धोत्रा, खाडेवाडी, केकाणवाडी, कानडीमाळी, दहीफळ (वड), केकतसारणी, पिसेगाव, बनकरंजा, कोल्हेवाडी, हनुमानवस्ती तुकुचीवाडी, शिरपुरा, आवसगाव, निवडुंगवाडी, कारेगव्हाण, सोनपेठवाडी, तांदळ्याचीवाडी आणि जोगाईवाडी या गावांचा समावेश आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सक्षम व सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

जनसुविधा आणि स्मशानभूमी बांधकामासाठी निधी
जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी 317 लाख रुपयांचा निधी स्मशानभूमी व कब्रस्तान बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे. नायगाव, तांबवा, बोरीसावरगाव, आडस (मुस्लीम समाज कब्रस्तान भिंत), मांगवडगाव, एकुरका, बाणेगाव, टाकळी, जिवाचीवाडी, बनकरंजा, वाघेबाभूळगाव, राजेवाडी, चतुरवाडी, चिचखंडी, येल्डा, धावडी, कुंबेफळ, ममदापूर, आपेगाव, शेपवाडी आणि केंद्रेवाडी या गावांमध्ये ही कामे होणार आहेत.

अंगणवाड्यांना नवीन इमारती
महिलां व बालकांच्या पोषण आणि शिक्षणाच्या दृष्टीने 26 गावांतील अंगणवाड्यांसाठी नवीन इमारती उभारण्यात येतील. यात आपेगाव, भावठाना, वरवटी, लाडेवडगाव, उंदरी (पवार वस्ती), युसुफवडगाव, खरमाटा, तांबवा, बनकरंजा, नाव्होली, बाणेगाव, मानेवाडी, जिवाचीवाडी (हनुमान वस्ती), शेपवाडी, साकुड, जोगाईवाडी (योगेश्वरी नगरी), उंदरी, सौंदना, कुंबेफळ, भालगाव, तांदळ्याचीवाडी, दस्तगीरवाडी, मोरेवाडी, सासुरा (पाळवदे वस्ती), सारूळ (विठ्ठलगड वस्ती) आणि डोका या ठिकाणांचा समावेश आहे.

शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरी
खाडेवाडी, धोत्रा, नाव्होली, मानेवाडी, एकुरका, केकाणवाडी, आगेवाडी, बनकरंजा (कुंभारवाडा) आणि पिट्टीघाट या शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले आहे.

आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून विकासाची गती
केज मतदारसंघातील नागरिकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या क्षेत्रात सातत्याने विकासकामे राबविण्याचे कार्य आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झालेला हा निधी ग्रामीण भागातील जनजीवनात सकारात्मक बदल घडवेल, असा आशावाद नागरिकांनी बोलून दाखवला.

दरम्यान, आ. मुंदडा यांनी सांगितले की, “केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक गावात सुविधा पोहोचवणे हे माझे प्राधान्य असून, पुढील काळात आणखी अनेक विकास कामे हाती घेतली जातील.” मतदार संघासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.


Categories

Recent Posts