Breaking

सायबर पोलीस स्टेशन बीडची उल्लेखनीय कामगिरी; तक्रारदारास ६५ हजारांची रक्कम परत

Updated: ऑक्टोबर 17, 2025

By Vivek Sindhu

सायबर पोलीस स्टेशन बीडची उल्लेखनीय कामगिरी; तक्रारदारास ६५ हजारांची रक्कम परत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांवर प्रभावी कारवाई करत नागरिकांचे नुकसान भरून a काढण्यात बीड सायबर पोलीस स्टेशन यशस्वी ठरत आहे. सायबर गुन्हे प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत बीड सायबर पोलीसांनी दाखविलेली तत्परता आणि तांत्रिक कौशल्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांची रक्कम परत मिळविण्याच्या अनेक प्रकरणांत उल्लेखनीय यश मिळत आहे.

अशाच एका प्रकरणात, यशवंत नगर, कॅनाल रोड, बीड येथील तक्रारदार केदारनाथ बहिरमल यांच्या ६५,००० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. तक्रारदाराने तत्काळ बीड सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधून तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांनी तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करत तांत्रिक तपास व बँक समन्वयाद्वारे फसवणुकीची रक्कम संबंधित खात्यांमध्ये गोठवून ती परत तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात यश मिळवले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश केळे, पोलीस अमंलदार निलेश उगलमुगले, आणि पोलीस हवालदार विजय घोडके यांनी केली.

बीड सायबर पोलीस स्टेशनने नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद लिंक, कॉल, मेसेज किंवा अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या आकर्षक आर्थिक ऑफरवर विश्वास ठेवू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी तसेच सायबर पोलीस स्टेशन, बीड येथे संपर्क साधावा.


Categories

Recent Posts