Breaking
Updated: ऑक्टोबर 15, 2025
ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहारात शेतकऱ्याची फसवणूक; ६ लाख ९० हजारांचा गंडा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : तालुक्यातील पांढरी गावात ट्रॅक्टर खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्याची तब्बल ६ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रविण सुभाषराव आखरे (वय ३३, रा. पांढरी ता. गेवराई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अभिजीत मोहन घोरपडे (रा. निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे) याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या मालकीचा एमएच-२३ बीसी-४४६५ क्रमांकाचा ट्रॅक्टर खरेदीसाठी ६ लाख ९० हजार रुपयांचा व्यवहार निश्चित केला.
आरोपीने वाहनाचा विक्री करारनामा करून घेतला आणि ५ लाख रुपये एनईएफटीद्वारे पाठविल्याचा खोटा स्क्रीनशॉट दाखवला. तसेच उर्वरित १ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश देऊन पूर्ण रक्कम दिल्याचे भासवून फिर्यादीचा ट्रॅक्टर आपल्या ताब्यात घेतला. परंतु आरोपीने एकही रुपये न देता फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस हवालदार झिकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.