Breaking
Updated: ऑक्टोबर 13, 2025
तात्या -आभई आदर्श प्रतिष्ठानचे सेवा गौरव पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – तात्या -आभई आदर्श प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवागौरव पुरस्कार शुक्रवार १० आक्टोंबर रोजी स्व.विलासराव देशमुख सभागृहात प्रदान करण्यात आले. यावेळी बीड जिल्ह्याचे खा.बजरंग सोनवणे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,जि.प.च्या समाज कल्याण विभागाचे सभापती प्रभाकर वाघमोडे, दगडू लोमटे, रामराव आडे, माणिकराव धायगुडे, संयोजक ऍड. राजेंद्रप्रसाद धायगुडे आदी उपस्थित होते. यावेळी विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ अँड. अशोक कुलकर्णी यांना विधी सेवा गौरव पुरस्कार, आरोग्य सेवेतील विशेष कार्याबद्दल डॉ.देवराव चामनर यांना आरोग्य सेवा गौरव पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती रेखा बडे-चोले यांना शिक्षण सेवा गौरव पुरस्कार,पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशांत बर्दापूरकर यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेख मुख्तार यांना समाजसेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भागवत मस्ने, रुद्राणी चौरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरां नी आपापल्या क्षेत्रात समाजासाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्या अतुलनीय सेवेचा गौरव तात्या-आभई प्रतिष्ठानने पुरस्कार देऊन केला असल्याचे मत उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले तसेच कै.ऍड.अण्णा साहेब लोमटे यांच्या स्मरणार्थ ऍड.राजेंद्रप्रसाद धायगुडे हे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात या बद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ. उमाकांत गाडवे,ऍड. अविनाश धायगुडे,ऍड. ओम लोंढाळ, श्रीकांत देवकते,सुनिल साखरे, ऍड.पुष्पा धायगुडे, देवनंदा सोनार आदींनी केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक ऍड.राजेंद्रप्रसाद धायगुडे यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रशांत धायगुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नवनाथ चौरे,गोपाळ कांदे, रावसाहेब करनर, तुळजाराम सोन्नर, दयानंद गडदे,अप्पा देवकते,वाघा मडके, प्रशांत हेडे,केशव भताने,अर्जुन चौरे, किरण सोन्नर,विजय देवकते आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,महिला,नागरीक उपस्थित होते.