Breaking
Updated: ऑक्टोबर 9, 2025
जोगाईवाडी मतदार यादीतून ११४४ मतदार गहाळ; तहसीलदारांकडे हरकत अर्ज दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : बीड जिल्हा परिषद निवडणूक गट क्रमांक ५६ जोगाईवाडीच्या प्रारुप मतदार यादीतून तब्बल ११४४ मतदार गहाळ झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या संदर्भात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील जगताप यांनी गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) तहसीलदार अंबाजोगाई यांच्याकडे हरकत अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक आयोगाने बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मुळ प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली असून, हरकती व सूचना नोंदविण्यासाठी यादी तहसील कार्यालयात ठेवण्यात आली आहे. आज या यादीचे निरीक्षण करताना जि.प. गट क्रमांक ५६ जोगाईवाडीच्या प्रसिध्द प्रारुप यादीतून यादी भाग क्रमांक १४७, १५१ आणि १५२ हे पूर्णतः गहाळ असल्याचे आढळून आले. या भागांतील ११४४ मतदारांचा उल्लेख न आढळल्याचे जगताप यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.
या गंभीर त्रुटीची कायदेशीर चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि गहाळ झालेल्या भागांचा समावेश करून प्रारुप यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी सुनील जगताप यांनी तहसीलदारांकडे केली आहे.