Breaking

12 ऑक्टोबरला आंबाजोगाईत डॉ. शिरीष खेडगीकर, यांचे व्याख्यान

Updated: ऑक्टोबर 8, 2025

By Vivek Sindhu

श्री. सिद्धेश्वर स्वामी यांना आंतरभारतीचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

श्री. सिद्धेश्वर स्वामी यांना आंतरभारतीचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार

आंबाजोगाई- आंतरभारती शाखा अंबाजोगाईच्या वतीने दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी गांधी जयंती निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विविध धर्माची केलेली विवेकी चिकित्सा यावर मा. डॉ. शिरीष खेडगीकर यांचे 12 ऑक्टोबर, रविवार रोजी सायं 4 वाजता, आधार मल्टिस्टेटच्या अजिंठा सभागृहात व्याख्यान होणार आहे.

 डॉ.शिरीष खेडगीकर हे मूळचे अंबाजोगाईचे असून सध्या ते औरंगाबाद येथे वैद्यकीय सेवा बजावतात. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचे विश्वस्त आहेत. विविध विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करणारे व्याख्याते म्हणून ते सर्वांना सुपरीचत आहेत.

रविवारी सायं 4.30 वाजता, आधार मल्टीस्टेट, जिजामाता कॉलनी, आंबाजोगाई येथे हे व्याख्यान होईल. अशी माहिती आंतरभारती, आंबाजोगाईच्या अध्यक्ष डॉ प्रा शैलजा बरुरे यांनी दिली.

पुरस्कार वितरण

आंतरभारती आंबाजोगाई तर्फे दिला जाणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी श्री. सिद्धेश्वर स्वामी यांना जाहीर झाला आहे. त्या पुरस्काराचे वितरण डॉ. शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती अमर हबीब (मार्गदर्शक) प्रा. डॉ. शैलजा बरुरे (अध्यक्ष) व संतोष मोहिते (सचिव), अनिकेत डिघोळकर (सहसचिव), महावीर भगरे (कोषाध्यक्ष) यांनी दिली.


Categories

Recent Posts