Breaking
Updated: ऑक्टोबर 7, 2025
सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा अंबाजोगाई वकील संघाने केला निषेध
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती बी.आर. गवई यांच्यावर सुनावणीदरम्यान एका वकिलाने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेविरोधात अंबाजोगाई वकील संघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपी वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघाने गृहमंत्री, भारत सरकार यांच्याकडे केली आहे.
वकील संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, ६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय असून न्यायव्यवस्थेच्या सन्मानावर आघात करणारी आहे. या निषेधार्थ अंबाजोगाई वकील संघाने आज ७ ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ८ ते १० ऑक्टोबर या कालावधीत संघाचे सर्व सदस्य लाल फिती लावून कामकाजात सहभागी होतील.
या मागणीचे निवेदन अंबाजोगाईवकील संघाने उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत गृहमंत्र्यांना पाठवले आहे. यावेळी अध्यक्ष अॅड. अजित लोमटे, सचिव अॅड. रविकांत सापते, अॅड. दिलीप गोरे यांच्यासह वकील संघाचे बहुतांशी सदस्य उपस्थित होते.