Breaking

विजयादशमीनिमित्त अंबाजोगाईत रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन आणि उत्सव

Updated: ऑक्टोबर 4, 2025

By Vivek Sindhu

विजयादशमीनिमित्त अंबाजोगाईत रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन आणि उत्सव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त अंबाजोगाई शहरात रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी भव्य पथसंचलन आणि उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संघशक्ती युगे-युगे या प्रमाणे अविरत सुरू असलेल्या या संघकार्यास व पारंपरिक विजयादशमी निमित्त आयोजित पथसंचलनात, स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात व शिस्तबद्ध रचनेत सहभागी होणार आहेत. सदरील पथसंचलन हे रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतीगृह, अंबाजोगाई येथून सायंकाळी ५.०० ते ५.४० दरम्यान होणार असून, संचलनासाठी वेळेपूर्वी १५ मिनिटे आधी, सर्वांनी संपूर्ण गणवेशात सदंड उपस्थित रहावे.

स्वयंसेवकांच्या जोशपूर्ण पावलांबरोबर नागरिकांनीही मोठ्या उत्साहात इतर व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावे. प्रतिवर्षीप्रमाणे या पथसंचलनात नक्कीच विविध समाजघटकांचा, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार आहेच, त्याशिवाय फुलांच्या उधळणीने आणि जल्लोषपूर्ण घोषणांनी स्वयंसेवकांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.

विजयादशमीच्या पर्वावर संघशक्ती, अनुशासन आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी, याच दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृह, अंबाजोगाई येथे प्रमुख वक्ते ऍड.आशिषजी जाधवर (प्रांत सद्भाव प्रमुख, देवगिरी प्रांत) यांचे बौद्धिक आयोजित करण्यात आले आहे.

तसेच, या उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून, ह.भ.प.किसन महाराज पवार (अध्यक्ष, मुकुंदराज संस्थान, अंबाजोगाई.) हे लाभणार आहेत. तरी, संघ शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्याचा-उत्सवाचा, सर्वांनी आवश्य लाभ घ्यावा आणि जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी नम्र विनंती व आवाहन करण्यात येत आहे.


Categories

Recent Posts