Breaking

धनगरवाडीत भरदुपारी घरफोडी

Updated: ऑक्टोबर 4, 2025

By Vivek Sindhu

धनगरवाडीत भरदुपारी घरफोडी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – तालुक्यातील धनगरवाडीत चोरट्याने भरदुपारी घराचे कुलूप तोडून आतील नगदी रक्कम व दागीने असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.२).रोजी घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसेंदिवस शहरी भागासह ग्रामीण भागात देखील चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. बीड तालुक्यातील धनगरवाडी येथील बंडू बाबुराव लकडे (वय ५०) यांच्या घराचे कूलुप गुरुवार (दि.२).रोजी दुपारी १२.४० ते ०२.१० च्या सुमारास तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील २ लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे लकडे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवार (दि.३)रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


Categories

Recent Posts