Breaking

श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात ४३० जणांची झाली नेत्र तपासणी

Updated: ऑक्टोबर 4, 2025

By Vivek Sindhu

नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान

अंबाजोगाई-: येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात मंगळवारी नमो नेत्र संजीवनी अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४३० जणांची नेत्र तपसणी झाली. यातील दृष्टिदोष असणाऱ्या मुलांवर स्वाराती रुग्णालयात उपचार होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा उपक्रम जाहीर केला. यानिमित्त नमो नेत्र संजीवनी अभियाना अंतर्गत धर्मादाय आयुक्त कार्यालय बीड, व खोलेश्वर विद्यालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरासाठी उद्घाटक म्हणून प्रदिप चौधरी
(उपायुक्त,धर्मादाय,बीड) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे होते.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.ज्ञानोबा दराडे,(नेत्र विभागप्रमुख,
स्वा.रा.ती.रुग्णालय)प्रा.डाॅ‌.एकनाथ शेळके,निखील सुरवसे (तंत्रज्ञ आंनदऋषी रूग्णालय,अहिल्या नगर), किरण कोदरकर
(कार्यवाह, स्थानिक व्यवस्था मंडळ),
अविनाश मुडेगांवकर(शालेय समितीचे अध्यक्ष),विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांची उपस्थिती‌ होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.ज्ञानोबा दराडे म्हणाले की, विद्यार्थी,शिक्षक व पालकांनी नेहमी आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे.पुस्तक वाचन करताना नेहमी ३०-३५ सेमी अंतर राखावे.वाचन करताना प्रकाशाची व्यवस्था पुरेशी असावी.आधुनिक साधनांचा वापर करताना ‘काॅम्युटर व्हिजन विड्रोम’ या नवीन आजारांपासून आपण सावध राहिले पाहिजे. असा सल्ला त्यांनी दिला.
उद्घाटन पर बोलताना धर्मादाय,
उपायुक्त प्रदिप चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. सकस आहार व व्यायामातूनच व्यक्तिमत्व घडते.यासाठी व्यायाम व मैदानी खेळ खेळा.डोळयांची काळजी घ्या. व निरोगी रहा.असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ.अतुल देशपांडे यांनी निरोगी राहण्याचा मूलमंत्र दिला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचलन अश्विनी सुर्यवंशी यांनी केले,स्वागत व मान्यवरांचा परीचय राजेंद्र शेप यांनी करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मुडेगांवकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार रूपाली मुळे यांनी मानले.ज्योती शिंदे यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.या शिबीराच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनंतराम कोपले,उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे,

पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे,पर्यवेक्षिका रूपाली मुळे,अभ्यासपुरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले.

यांनी केली नेत्र तपासणी:
श्री.खोलेश्वर विद्यालयात मंगळवारी झालेल्या नेत्र तपासणीसाठी प्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ.डॉ.ज्ञानोबा दराडे,डॉ.एकनाथ शेळके,डॉ.किरण सरवदे,डॉ.हर्षदा सुर्यवंशी,डॉ.संतोष चांदणे,डॉ.नागेश लांडगे,तंत्रज्ञ प्रथमेश कणके,कल्याणी कांबळे यांनी काम केले.
आनंदऋषी नेत्रालयाचे तंत्रज्ञ निखील सुरवसे हे उपस्थित होते.


Categories

Recent Posts