Breaking
Updated: ऑक्टोबर 1, 2025
श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी रात्री पुर्णाहुती, होमहवन व महापुजेने घटस्थापनेची व योगेश्वरी देवीची महापुजा झाली.
अप्पर जिल्हाधिकारी सौ. अश्विनी जिरगे(सोनवणे), श्री.हरिश्चंद्र सोनवणे यांनी श्री
यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. मंगळवारी सायंकाळी मंदिरात पुर्णाहुती व होमहवन होऊन महापुजा झाली. अप्पर जिल्हाधिकारी सौ. अश्विनी जिरगे(सोनवणे), श्री.हरिश्चंद्र सोनवणे यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा,सचिव गिरधारीलाल भराडीया, सहसचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष सौ.पूजा राम कुलकर्णी, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, विश्वस्त आ.नमिता मुंदडा,राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे,भगवानराव शिंदे,ॲड.शरद लोमटे,श्रीराम देशपांडे,विश्वस्त तथा मुख्य पुजारी सारंग पुजारी,सौ.गौरी जोशी, संजय भोसले, हंसराज देशमुख,शिरीष पांडे, प्रवीण दामा, राजन पुजारी
यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.
गुरुवारी योगेश्वरी देवीच्या पालखीने महोत्सवाची सांगता:
श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता गुरुवारी विजयादशमीच्या निमित्ताने देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी शहरातून निघणार आहे. दुपारी एक वाजता पालखी मंदिरातून निघणार आहे. प्रतिवर्षी ठरल्याप्रमाणे नियोजित मार्गाने मंडी बाजार, रविवार पेठ, खडकपूरा, परळीवेस, मांडवा रोड, अण्णाभाऊ साठे चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक,हौसिंग सोसायटी, मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक,गुरुवार पेठ, मार्गे प
पालखीचे मार्गक्रमण होणार आहे. अशी माहिती देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे , सचिव गिरधारीलाल भराडीया यांनी दिली.