केज – गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या दमदार मान्सूनपूर्व पावसाने नदी नाल्यांना भरती आल्याने मांजरा नदी दुधडी भरून वाहू लागल्याने १२ तासात धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात तब्बल ४.८४९ दलघमी इतका पाणी साठा वाढला आहे.