Breaking

Updated: May 31, 2025

By Vivek Sindhu

सैनिकांच्या शौर्याला सलाम

WhatsApp Group

Join Now

सैनिकांच्या शौर्याला सलाम -खा रजनीताई पाटील

काँग्रेसच्या जय हिंद यात्रेत सैनिकांचा आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान

केज – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आयोजित केलेल्या जय हिंद यात्रा कार्यक्रम शिमला येथील हॉटेल पीटरऑफ येथे घेण्यात आला. कारगील युद्ध आणि ऑपरेशन शेंदूर यामध्ये पराक्रम करणाऱ्या सैनिकांचा आणि शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.


सैनिकांच्या बलिदान आणि शौर्य यामुळेच देश सुरक्षित आहे त्यांच्या शौर्याला आमचा सलाम असे मत खा.रजनीताई पाटील यांनी व्यक्त केले. त्या जय हिंद यात्रा कार्यक्रमात बोलत होत्या.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा सिंग, काँग्रेस हिमाचल प्रदेशच्या प्रभारी खा. रजनीताई पाटील आणि ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन शूर सैनिकांचा गौरव करण्यात आला.


पराक्रमी सैनिक आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करताना उपस्थित जन भावूक झाले. यावेळी काँग्रेसच्या वतीने सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करून देशाच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. जय हिंद यात्रा कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.